सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?

सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?

| Updated on: Dec 03, 2024 | 12:10 PM

ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत गावकऱ्यांनी मारकडवाडी गावात फेरमतदानाचा निर्णय घेतला आहे. माळशिरसचे आमदार आणि शरद पवार राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या समर्थकांकडून आज मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील ग्रामस्थांनी पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. ईव्हीएम मशीनवर अविश्वास दाखवत गावकऱ्यांनी मारकडवाडी गावात फेरमतदानाचा निर्णय घेतला आहे. माळशिरसचे आमदार आणि शरद पवार राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या समर्थकांकडून आज मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. याकरता ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मतदान प्रक्रिया राबवण्याची परवानगी मागितली होती. पण प्रशासनाने त्याला परवानगी नाकारली असून जिल्हा प्रशासनाने तातडीने या गावात जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. यासोबतच मारकडवाडीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे. मारकडवाडीमध्ये भाजपच्या राम सातपुते यांना अधिक मतदान झाल्याने गावकऱ्यांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. या गावात उत्तम जानकर यांचं मताधिक्य असताना भाजपच्या राम सातपुते यांना अधिक मतं कशी पडली? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. याआधीच्या अनेक निवडणुकांमध्ये जानकर यांना जास्त मतं पडल्याचा गावकऱ्यांनी दावा केला आहे. तर मतदानाची चाचणी व्हावी यासाठी गावकऱ्यांकडून बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव झाला आहे. उत्तम जानकर गटाचा स्वखर्चाने गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आज मारकडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जाणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Published on: Dec 03, 2024 12:10 PM