एक एक करुन सगळे आमदार गेले, एकनाथ शिंदे गेले
हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार नसतानाही आम्हाला महाविकास आघाडीबरोबर जावं लागलं. तर आता मात्र एक विचार घेऊन एकनाथ शिंदे चालले आहेत, आणि हेच खरे सरकार असल्याचेही मत आमदार शहाजी पाटील यांनी मांडले.
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केले तेव्हा, राजकीय नेत्यांनी, माध्यमांनी आम्ही बंड केले, कुणी आम्हाला गद्दार म्हणाले तर कुणी एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन गेले अशी टीका आमच्यावर झाली मात्र ही टीका झाली असली तरी एकनाथ शिंदे यांनी केलेले हे बंड नव्हते तर भारताच्या राजकीय इतिहासात ही राजकीय क्रांती होती असं मत पुरंदरमधील सभेप्रसंगी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मांडले. यावेळी त्यांनी सांगितले की ज्या वेळी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले त्यावेळी आम्हाला जबरदस्तीने या महाविकास आघाडीत नेऊन बसवले, त्यामध्ये आम्हाला काही किंमत नव्हती मात्र आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याचा आम्हाला आनंद होता, त्यामुळे आम्ही त्यावेळी काही बोललो नाही. मात्र त्यावेळी हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाणारे सरकार नसतानाही आम्हाला महाविकास आघाडीबरोबर जावं लागलं. तर आता मात्र एक विचार घेऊन एकनाथ शिंदे चालले आहेत, आणि हेच खरे सरकार असल्याचेही मत आमदार शहाजी पाटील यांनी मांडले.