अमोल मिटकरी यांचा पक्ष सरदारांचा…त्यांनी लोकांची लूट केली, आता पोत्याने नोटा असल्याने थयथयाट सुरु, सदाभाऊ खोत यांचा गंभीर आरोप
देशाच्या चलनातून 2 हजाराची नोट व्यवहारासाठी बंद करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नोटबंदीवरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली.
सातारा : देशाच्या चलनातून 2 हजाराची नोट व्यवहारासाठी बंद करण्यात आली आहे. यामुळे विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. नोटबंदीवरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. “2 हजाराची नोट व्यवहारासाठी बंद करण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण मला पंतप्रधान पदाचे डोहाळे लागलेले नव्हते, तुमचा पक्ष हा सरदारांचा असून तुमच्याच पक्षाकडे 2000, 500 च्या नोटा पोत्याने असल्याने तुमचा थयथयाट सुरू आहे, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांच्यावर केला आहे. “पाचशेची ही नोट बंद करा असे सदाभाऊ खोत यांनी वक्तव्य केलं होतं यावर अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंना पंतप्रधान करा”, अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना सदाभाऊ खोत यांनी वरील आरोप केला.