Sambhaji Brigade |गिरीश कुबेर यांना काळं फासून कार्यकर्त्यांनी वैचारिक प्रतिक्रिया दिली :संतोष शिंदे

| Updated on: Dec 05, 2021 | 8:34 PM

स्वतःच्या पुस्तकांमध्ये सोयराबाई महाराणी साहेब यांचा खून संभाजीराजांनी केला. अशा पद्धतीचे वादग्रस्त व संतापजनक लिखाण गिरीश कुबेर यांनी केलं. त्या कुबेराला साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचे अध्यक्ष पद छगन भुजबळ यांनी केलं. यापेक्षा बदनामीचे समर्थन दुसरं कुठलंही असू शकत नाही, असे शिंदे म्हणाले.

नाशिक : छत्रपतींपेक्षा आम्हाला कोणीही मोठा नाही. आम्ही सगळं सहन करू शकतो मात्र त्यांची बदनामी कदापीही सहन करू शकत नाही. अ. भा. साहित्य संमेलनात शिवद्रोही गिरीश कुबेर अध्यक्ष म्हणजे शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ. गिरीश कुबेर ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केली. स्वतःच्या पुस्तकांमध्ये सोयराबाई महाराणी साहेब यांचा खून संभाजीराजांनी केला. अशा पद्धतीचे वादग्रस्त व संतापजनक लिखाण गिरीश कुबेर यांनी केलं. त्या कुबेराला साहित्य संमेलनाच्या परिसंवादाचे अध्यक्ष पद छगन भुजबळ यांनी केलं. यापेक्षा बदनामीचे समर्थन दुसरं कुठलंही असू शकत नाही, असे शिंदे म्हणाले.