Sanjay Raut : गळून पडलेल्या पानातून नवीन पालवी फुटत नाही, ती झाडातून फुटते, त्यांनी अभ्यास करावा, शिवसेना नेते संजय राऊतांचा टोला

Sanjay Raut : गळून पडलेल्या पानातून नवीन पालवी फुटत नाही, ती झाडातून फुटते, त्यांनी अभ्यास करावा, शिवसेना नेते संजय राऊतांचा टोला

| Updated on: Jul 26, 2022 | 11:14 AM

शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या लोकांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, असा टोलाही शिवसेना नेते संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला लगावलाय. यावेळी त्यांनी अर्जुन खोतकरांवरही भाष्य केलंय.

मुंबई :  ‘गळलेल्या पानातून पालवी फुटत नाही. झाडातून पालवी फुटते, त्यांनी जरा अभ्यास केला पाहिजे,’ असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी वारंवार शिंदे गटाचा पालापाचोळा असा उल्लेख केलाय. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता संजय राऊतांनी त्यावर उत्तर दिलंय. दरम्यान, कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही, मनसेबद्दल मुलाखतीत काहीच नाही, मुलाखतीचा फक्त एक भाग आलाय, पूर्ण मुलाखत होऊ द्या, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर दिली आहे. आज त्यांनी यावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तर दिल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि उलथापालथ यावर त्यांनी भाष्य केल्याचंही राऊत म्हणालेत. शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्या लोकांना वाईट वाटून घेण्याचं कारण नाही, असा टोलाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला लगावला आहे. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीवर (Udhhav Thackeray Interview) भाष्य केलंय. तर याचदरम्यान त्यांनी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनीया गांधी यांची ईडी चौकशी, शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांची आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्या भेटीवरही भाष्य केलंय.

Published on: Jul 26, 2022 11:10 AM