संजय राऊत यांच्या ‘त्या’ दाव्यानं सनसनाटी, खोट्या मॅपद्वारे केला दावा अन् स्वतःच उघडे पडले!
अयोध्येत भव्य राम मंदिराचं स्वप्न असंख्य भक्तांनी पाहिलं. मात्र त्या ठिकाणी हे मंदिर नसल्याचे सांगत राऊतांनी सनसनाटी निर्माण केली आहे. बाबरी ढाचा पाडला त्या ठिकाणी हे मंदिर नसून ३ किलोमीटर दूर असल्याचा दावा त्यांनी केला. तर यासाठी संजय राऊत यांनी एका चुकीचा मॅपचा आधार घेतलाय
मुंबई, १७ जानेवारी २०२३ : अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय. बाबरीच्या ठिकाणी मंदिर नसून ३ किमी मंदिर दूर असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलेय. पण या दाव्यावरून संजय राऊत चांगलेच उघडले पडले आहेत. राऊतांच्या या दाव्यानं प्रभू श्रीरामांच्या भक्तांची चिंता वाढली. दावा काही साधा नव्हता. कारण अयोध्येत भव्य राम मंदिराचं स्वप्न असंख्य भक्तांनी पाहिलं. मात्र त्या ठिकाणी हे मंदिर नसल्याचे सांगत राऊतांनी सनसनाटी निर्माण केली आहे. बाबरी ढाचा पाडला त्या ठिकाणी हे मंदिर नसून ३ किलोमीटर दूर असल्याचा दावा त्यांनी केला. तर यासाठी संजय राऊत यांनी एका चुकीचा मॅपचा आधार घेतलाय. व्हायरल होणाऱ्या या मॅपमध्ये अयोध्येतील नवं राम मंदिर एकीकडे आणि बाबरी मस्जिद एकीकडे दिसत आहे. यावरून राऊत म्हणताय….राम मंदिर वही नही बना हुआ है…. बघा कोणता आहे तो मॅप, अन् बघा काय आहे फॅक्ट?