Saamana : लोकशाहीचं तोंड जगात काळं करणारा… अपात्रतेच्या निकालावर ‘सामना’तून थेट हल्लाबोल
'निकाल ठरलेलाच होता. दिल्लीतील मालकांनी निकालपत्र लिहून दिलं होतं, असाही घणाघात करण्यात आलाय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे.'शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकालावरून सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.
मुंबई, ११ जानेवारी, २०२४ : महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली असं म्हणत शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील निकालावरून सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. निकाल ठरलेलाच होता. दिल्लीतील मालकांनी निकालपत्र लिहून दिलं होतं, असाही घणाघात करण्यात आलाय. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल म्हणजे घटना, कायद्याचा मुडदा पाडून दिल्लीच्या मदतीने महाराष्ट्रावर केलेला आघात आहे. विधानसभा अध्यक्षांनी सकाळीच सांगितले होते, ‘बेंचमार्क’ निर्णय देऊ. प्रत्यक्षात लोकशाहीचे तोंड जगात काळे करणारा निर्णय त्यांनी दिला आहे. इतिहास घडवण्याची संधी त्यांनी गमावली, असल्याचे सामनातून म्हटले आहे तर ‘आपल्यामागे दिल्लीची महाशक्ती आहे. चिंता नको’, असे शिंदे वारंवार फुटीर आमदारांना सांगत राहिले, पण राहुल नार्वेकर घटनेच्या पदावर बसून असत्य सांगतात की, या सगळयाशी भाजपचा संबंध नाही. महाराष्ट्रातील चोर मंडळास मान्यता देण्यासाठी घटनेची पायमल्ली केली. ज्यांनी हे केले त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही, अशी थेट टीकाच यातून करण्यात आलीये.