…होय मी त्यांचा अपराधी आहे
शिवसेनेचे सरकार पाडण्यासाठी मला आलेल्या धमक्या आमि त्यानंतर व्यंकय्या नायडू यांना लिहिलेले पत्राचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेसाठी आपण बोलत राहणारच असल्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतू बंड केल्यापासून त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संजय राऊत यांनीच शिवसेना संपवली असल्याचे बोलले जात असतानाच त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी आज जो काही आहे तो शिवसेनेमुळे आहे, बाळासाहेबांमुळे आहे त्यामुळे मी जर शिवसेना वाचवण्यासाठी बोलत असेन आणि शिंदे गटाला तो माझा अपराध वाटत असेल तर होय मी त्यांचा गुन्हेगार आहे अशा सडेतोड शब्दात त्यांनी बंडखोर शिंदे गटाला उत्तर दिले आहे. शिवसेनेचे सरकार पाडण्यासाठी मला आलेल्या धमक्या आमि त्यानंतर व्यंकय्या नायडू यांना लिहिलेले पत्राचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. शिवसेनेसाठी आपण बोलत राहणारच असल्याचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
Published on: Jul 14, 2022 09:16 PM