उद्धव ठाकरे यांनी घेतलेली ‘ती’ शपथ खरी, संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Mar 08, 2024 | 6:22 PM

भाजप आणि शिवसेना यांच्यात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असणार असं ठरलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनाच भाजप सोबत युती करायची नव्हती, असेही संजय शिरसाट यांनी म्हटलं. शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी काय केला मोठा गौप्यस्फोट?

मुंबई, ८ मार्च २०२४ : शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद असणार असं ठरलं होतं. मात्र उद्धव ठाकरे यांनाच भाजप सोबत युती करायची नव्हती, असेही संजय शिरसाट यांनी म्हटलं. पुढे संजय शिरसाट असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी तुळजाभवानीची जी शपथ घेतली तीदेखील खरी आहे. उद्धव ठाकरेंनी कालच्या सभेत अमित शाह खोटं बोलतायत असं सांगितलं. तसंच भाजपासोबत युतीत असताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते खरं आहे. सुरुवातीची अडीच वर्षे भाजपा मुख्यमंत्रीपद घेणार होती. त्यानंतर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडे असणार होते, असं वक्तव्य करत संजय शिरसाट यांनी मोठा गौप्यस्फोटच केला आहे.

Published on: Mar 08, 2024 06:22 PM