वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे ‘या’ जिल्ह्यात पुन्हा मास्कसक्ती
VIDEO | कोरोना पॉझिटिव्हिटी दर 25.00% इतका, खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा जिल्ह्यात मास्क लावणं अनिवार्य
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मागील 24 तासात जिल्ह्यात 12 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3 व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सातारा जिल्हात एकूण 45 कोरोनाचे रुग्ण आहेत. जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर 25.00% इतका आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. तर कोरोना वाढता फैलाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. शाळा, महाविद्यालय, शासकीय आणि निमशासकीय कार्यालय अशा सार्वजनिक ठिकाणी जिल्हा प्रशासनानं मास्क वापरणं अनिवार्य केले आहे.
Published on: Apr 04, 2023 03:22 PM