Sharad Pawar-Ajit Pawar : काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
Pawar Family Politics : पुण्यात आज शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक बैठक पार पडली आहे. या बैठकीचे कारण मात्र अद्याप समजलेले नाही.
पुण्यात आज शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक बैठक पार पडली आहे. पुण्यातली साखर संकुलातली बैठक संपल्यानंतर काका-पुतण्याची ही बैठक झाली आहे. शरद पवार यांच्या दालनात दोन्ही नेत्यांची ही बैठक पार पडली. दोघातच झालेल्या या बैठकीमुळे पुन्हा एकदा काका-पुतण्या एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
शरद पवार यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत शरद पवार, अजित पवार आणि 2 अधिकारी उपस्थित होते. साखर संकुलातली बैठक संपताच आधी शरद पवार हे आपल्या दालनात पोहोचले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ अजित पवार आणि दोन्ही अधिकारी त्यांच्या दालनात गेले. ही बैठक नेमकी कशासंदर्भात होती, हे समजू शकलेलं नाही. तब्बल 15 ते 20 मिनिटं ही स्वतंत्र बैठक सुरू होती. गेल्या 15 दिवसात आज चौथ्यांदा शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित आले. त्यामुळे आता त्यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग

राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?

ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं

भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
