शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? शिवसैनिकांचा कौल कोणाच्या बाजूने?

शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? शिवसैनिकांचा कौल कोणाच्या बाजूने?

| Updated on: Jun 19, 2023 | 1:06 PM

आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही वर्धापन दिनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

मुंबई : आज शिवसेनेचा 57 वा वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही वर्धापन दिनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरे गटाचा मेळावा किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे. तर शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या सभास्थळी महिलांची गर्दी जमायला सुरुवात झाली. अनेक महिला पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज काय बोलणार यासाठी सभास्थळी दाखल झाल्या आहेत. नेमकं या महिलांनी काय भूमिका मांडली आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jun 19, 2023 01:06 PM