एकनाथ शिंदेंच्याच 'या' दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड, 5 तास रखडल्यानंतरही भेट नाकारली

एकनाथ शिंदेंच्याच ‘या’ दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड, 5 तास रखडल्यानंतरही भेट नाकारली

| Updated on: Dec 14, 2024 | 12:55 PM

दीपक केसरकर, तानाजी सावंत यांचीही मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. काल पाच तास थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नाही. एकनाथ शिंदे यांनी दिपक केसरकर, तानाजी सावंत या दोन्ही माजी मंत्र्यांची भेट नाकारल्याने त्या दोघांना निराश होऊन परतावे लागले.

महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये येत्या १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरु आहेत. भाजपमधील इच्छुक देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी सागर बंगल्यावर जात आहेत. यात शिवसेनेचे आमदार सुद्धा आहेत. मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असून काल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, भरत गोगावले, बालाजी किणीकर यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र दीपक केसरकर, तानाजी सावंत यांचीही मंत्रिपद मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. काल पाच तास थांबून ही एकनाथ शिंदे यांनी भेट दिली नाही. एकनाथ शिंदे यांनी दिपक केसरकर, तानाजी सावंत या दोन्ही माजी मंत्र्यांची भेट नाकारल्याने त्या दोघांना निराश होऊन परतावे लागले. या दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याआधी मंत्री दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांच्या दरेगावी एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री आजारी असल्याचे कारण सांगून त्यांना ही भेट नाकारण्यात आली होती.

Published on: Dec 14, 2024 12:53 PM