घरकुल योजनेचा लाभ द्यावा; मोबाईल टॉवरवर चढून काँग्रेस कार्यकर्त्याच शोले स्टाईल आंदोलन

“घरकुल योजनेचा लाभ द्यावा”; मोबाईल टॉवरवर चढून काँग्रेस कार्यकर्त्याच शोले स्टाईल आंदोलन

| Updated on: Jul 31, 2023 | 12:46 PM

रमाई घरकुल योजना आणि पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याने अनोखे आंदोलन केले आहे. या काँग्रेस कार्यकर्त्याने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले आहे.

बुलढाणा, 31 जुलै 2023 | रमाई घरकुल योजना आणि पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून काँग्रेस कार्यकर्त्याने अनोखे आंदोलन केले आहे. या काँग्रेस कार्यकर्त्याने मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. घरकुल योजनेच्या यादीत नाव येऊनही तीन वर्ष उलटली तरी लाभार्थ्यांना घरकुल वाटप केले नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ घरकुल उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्याने हे आंदोलन सुरु केलं आहे. जोपर्यंत आश्वासन पूर्ण होणार नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याची भूमिका कार्यकर्त्याने घेतली आहे. मनोज जाधव असे आंदोलनकर्त्याचे नाव आहे.

 

Published on: Jul 31, 2023 12:46 PM