अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणाऱ्या बाळापूर शेगाव मार्गावरील जवळा गावाजवळ ओढ्याला आलेल्या पुरामुळे बाळापूर - शेगाव वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. यानंतर अकोट तालुक्यातही जोरदार पाऊस झाल्याने आलेल्या पुरात घर आणि शौचालय वाहून गेलंय.