श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन, पाहा व्हीडिओ…

| Updated on: Sep 10, 2022 | 11:56 AM

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पांचाळेश्वर घाटावर विसर्जन झालं.यावेळी गणेशभक्त भावूक झाले होते. 

दोन वर्षानंतर वाजत गाजत गणेशोत्सव साजरा केला गेला. दहा दिवसांच्या या उत्सवानंतर आता वेळ झाली आहे ती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची… प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं पांचाळेश्वर घाटावर विसर्जन (Shrimant Dagdusheth Halwai Ganapati Visarjan 2022) झालं.यावेळी गणेशभक्त भावूक झाले होते.  यंदाची मिरवणूक उशिरा निघाली मात्र भाविकांमध्ये उत्साह कायम होता. साडे दहाच्या सुमारास ही मिरवणूक अल्का टॉकिज परिसरात आली. तिथे नागरिकांनी गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मिरवणूक पुढे सरकली. अन् अखेर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला (Dagdusheth Halwai Ganapati) निरोप देण्यात आला. महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम हौदात बाप्पाचं विसर्जन पार पडलं.

नंदुरबारमध्ये दादा-बाबा गणपतीची हरीहर भेट मोठ्या उत्साहात संपन्न
गणेश विसर्जनानंतर अमित ठाकरेंकडून चौपाटीवर स्वच्छता मोहीम; तरुणांशीही साधाला संवाद