Chipi Airport | राणे-ठाकरे एकाच व्यासपीठावर, चिपी विमानतळ उद्घाटनावरून मानापमान नाट्य रंगणार
सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. दुपारी 1 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. मागील अनेक महिन्यांपासून चिपीच्या श्रेयवादावरुन बरीच लढाई महाराष्ट्राने पाहिली. आज त्या लढाईचा शेवट सिंधुदुर्गच्या विकासाच्या आड येणाऱ्या सेनेच्या नेत्यांची नावे फोडून करु, असा इशारा राणेंनी दिला आहे.
सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ होत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. दुपारी 1 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. मागील अनेक महिन्यांपासून चिपीच्या श्रेयवादावरुन बरीच लढाई महाराष्ट्राने पाहिली. आज त्या लढाईचा शेवट सिंधुदुर्गच्या विकासाच्या आड येणाऱ्या सेनेच्या नेत्यांची नावे फोडून करु, असा इशारा राणेंनी दिला आहे. तर सेनेनेही खासदार विनायक राऊतांना विमानतळ निर्मितीचं श्रेय देत राणेंवर पलटवार केलाय.
चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.