Allu Arjun Arrest : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
अल्लू अर्जुनला जवळून पाहण्यासाठी फॅन्सने मोठी गर्दी केली होती. या गर्दीवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
साऊथ सुपरस्टार, अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. गेल्या 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांकडून अल्लू अर्जुनला अटक कऱण्यात आलं आहे. अल्लू अर्जुनला जवळून पाहण्यासाठी फॅन्सने मोठी गर्दी केली होती. या गर्दीवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ‘पुष्पा 2’च्या प्रीमिअरदरम्यान चेंगराचेंगरीत श्वास गुदमरल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याने त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी त्याने केली होती. मात्र आज अल्लू अर्जुनला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या चेंगराचेंगरी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी अल्लू अर्जुनविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सुरू करण्यात आलेल्या तपासादरम्यान पोलिसांनी थिएटर मालक, थिएटरचे वरिष्ठ व्यवस्थापक आणि थिएटरमधील एका बाल्कनीचे प्रभारी अशा तिघांना ताब्यात घेतले आहे. तर अल्लू अर्जुनने एफआयआर रद्द करण्याची याचिका दाखल करत याचिका निकाली निघेपर्यंत अटकेसह पुढील सर्व कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केल्याचेही सांगितले जात आहे.