Special Report | Gudi Padwa, Ram Navamiला शोभयात्रा निघेल की नाही?-tv9

Special Report | Gudi Padwa, Ram Navamiला शोभयात्रा निघेल की नाही?-tv9

| Updated on: Apr 01, 2022 | 8:37 PM

या सरकारकडून हिंदू सणांच्या बाबतीत दुजाभाव होत असल्याचा आरोप भाजप करत आहे. त्यातच आता हिंदू नववर्षाच्‍या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रेला परवानगी द्या. तसेच राम नवमीच्‍या मिरवणुका काढण्यास व हिंदू सण जल्लोषात साजरे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने मुंबई पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

मुंबई : या सरकारकडून हिंदू सणांच्या बाबतीत दुजाभाव होत असल्याचा आरोप भाजप करत आहे. त्यातच आता हिंदू नववर्षाच्‍या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रेला परवानगी द्या. तसेच राम नवमीच्‍या मिरवणुका काढण्यास व हिंदू सण जल्लोषात साजरे करण्यास परवानगी द्या, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने मुंबई पोलीस उपायुक्त यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. मुंबई पोलीस प्रशासन यंत्रणेकडून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या विविध कारणांचा मुंबईकर आपल्या दैनंदिन आयुष्यात सामना करत असतात. त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रार्थना स्थळांमधून लाऊडस्पीकरवरून केली जाणारी अजान आहे. कोणीही अजानच्या विरोधात नसून लाऊडस्पीकरच्या माध्यमातून मोठ्या आवाजात अजान दिल्यामुळे ध्वनिप्रदूषण होत असून मुंबईकरांचा याला विरोध आहे. मुंबईकरांच्या भावना मुंबई पोलीस उपायुक्तांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी मुंबई भाजपा शिष्टमंडळानं पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आणि हिंदू सण जल्लोषात साजरे करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारे निवेदन सुपूर्द केले.

Published on: Mar 29, 2022 09:14 PM