Special Report | Raj Thackeray यांचा दावा टिळकांच्या वंशजांनीच फेटाळला? -tv9
पुरंदरे आणि जेम्स लेनच्या लिखाणवरुन वाद संपत नाही, तोच राज ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बांधकामाचा मुद्दा उकरुन काढलाय आणि त्यावरुन नेते आणि अनेक इतिहासकार राज ठाकरेंच्या दाव्यांवरच प्रश्न उभे करतायत.
पुरंदरे आणि जेम्स लेनच्या लिखाणवरुन वाद संपत नाही, तोच राज ठाकरेंनी शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बांधकामाचा मुद्दा उकरुन काढलाय आणि त्यावरुन नेते आणि अनेक इतिहासकार राज ठाकरेंच्या दाव्यांवरच प्रश्न उभे करतायत. आता हा मुद्दा अजून चिघळू लागलाय. राज ठाकरेंच्या मते लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा शिवरायांची समाधी बांधली. हा दावा खोडून काढणाऱ्यांच्या मते टिळकांनी समाधीच्या नावावर जमवलेले पैसे कधी खर्चच केले नाहीत. फक्त राजकीय नेतेच नव्हे तर इतिहासकार आणि पत्रकारांनीही राज ठाकरेंच्या दाव्यांना खोडून काढलंय. राज ठाकरेंनी दुसरा मुद्दा मांडला तो जेम्स लेनच्या लिखाणाचा. मुलाखतीचा दाखला देत जेम्स लेन कधीही पुरंदरेंना भेटला नसल्याचं राज ठाकरे म्हटले. पण इतिहास अभ्यासकांच्या मते जेम्स लेनच्या पुस्तकातल्या संदर्भसूचीतच पुरंदरेंची पुस्तकं संदर्भ म्हणून
वापलीयत.