Special Report | पुण्यातील मनसेच्या शाखाध्यक्षांना राज ठाकरेंची भन्नाट ऑफर
चांगलं काम करा. तुमच्या घरी जेवायला येतो, अशी ऑफरच राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना दिली आहे. त्यामुळे राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत जोरदार चर्चा सुरू आहे.
पुणे पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघांचा आढावा घेतानाच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं कामही राज ठाकरे यांनी सुरू केलं आहे. त्यातच त्यांनी कार्यकर्त्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. चांगलं काम करा. तुमच्या घरी जेवायला येतो, अशी ऑफरच राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांना दिली आहे. त्यामुळे राज यांच्या या ऑफरची सध्या मनसेत जोरदार चर्चा सुरू आहे.
Published on: Jul 20, 2021 09:42 PM