Special Report | डंके की चोट पर…डोलो गोळीचा डंका देशभर!

| Updated on: Jan 17, 2022 | 10:08 PM

कोरोनाच्या फैलावानंतर जितके वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्या मालामाल झाल्या, तितकंच किंवा त्याहूनही जास्त मार्केट एकट्या डोलो नावाच्या गोळीनं खावून टाकलं. डोलो- 650 ही गोळी भलेही ताप उतरवणारी असेल, मात्र याच गोळीच्या खपामुळे सध्या इतर पॅरासिटामॉल कंपन्यांना ताप आणलाय. कोरोनाच्या २ वर्षात डोलोच्या तब्बल 350 कोटी गोळ्या विकल्या गेल्याची माहिती समोर आलीय. 2021 च्या नोव्हेंबरपर्यंत डोलोच्या 14.5 कोटी पाकीटं विकली गेली.

कोरोनाच्या फैलावानंतर जितके वॅक्सिन बनवणाऱ्या कंपन्या मालामाल झाल्या, तितकंच किंवा त्याहूनही जास्त मार्केट एकट्या डोलो नावाच्या गोळीनं खावून टाकलं. डोलो- 650 ही गोळी भलेही ताप उतरवणारी असेल, मात्र याच गोळीच्या खपामुळे सध्या इतर पॅरासिटामॉल कंपन्यांना ताप आणलाय. कोरोनाच्या २ वर्षात डोलोच्या तब्बल 350 कोटी गोळ्या विकल्या गेल्याची माहिती समोर आलीय. 2021 च्या नोव्हेंबरपर्यंत डोलोच्या 14.5 कोटी पाकीटं विकली गेली. एका पाकिटात डोलोच्या 15 गोळ्या येतात आणि 2019 मध्ये भारतात डोलोच्या 7.5 कोटी स्ट्रिप्स विकल्या गेल्या होत्या.

फक्त 2 वर्षात एखाद्या ब्रँडच्या साडे तीनशे कोटी गोळ्यांची विक्री होणं, ही कमालीची गोष्ट आहे. रंजक म्हणजे डोलोच्या विक्रीची तुलनाही रंजक पद्धतीनं केली जातेय. फक्त २ वर्षात भारतात विक्री झालेल्या डोलोच्या गोळ्या जर एकावर एक ठेवल्या, तर त्यांची उंची ही माऊंट एव्हरेस्टच्या ६ हजार पट आणि जगातल्या सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफाच्या 50 हजार पट भरेल.

ताप आला की सर्वसामान्य भारतीयांमध्ये क्रोसिन नावाची गोळी लोकप्रिय आहे. मात्र कोरोनानंतर डोलोला मिळालेली लोकप्रियता जास्त ठरली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले मिम्स गोळीतला कंटेड आणि कंपनीनं नेमकेपणानं केलेलं मार्केटिंग या डोलोमागच्या प्रसिद्धीचं कारण सांगितलं जातात.

Published on: Jan 17, 2022 10:06 PM