Special Report | संजय राऊतांचे 2 टार्गेट ED आणि Kirit Somaiya -Tv9

Special Report | संजय राऊतांचे 2 टार्गेट ED आणि Kirit Somaiya -Tv9

| Updated on: Mar 08, 2022 | 9:40 PM

गेल्या पत्रकार परिषदेत आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजही मोठे गौप्यस्फोट केले. राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेऊन आरोप केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नाव घेऊन राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केले.

मुंबई: गेल्या पत्रकार परिषदेत आरोपांची राळ उडवून दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजही मोठे गौप्यस्फोट केले. राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत थेट नाव घेऊन आरोप केले. भाजप नेते किरीट सोमय्या यांचे नाव घेऊन राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केले. तसेच सोमय्या यांची चिरंजीव नील सोमय्या यांना निकॉनमध्ये पार्टनरशीप कशी मिळाली ते ईडीचं वसुली रॅकेट कसं चालतं इथपर्यंतचा पर्दाफाश राऊतांनी केला. तसेच राकेश वाधवानला पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करुनही जमीन घेतली. हे सगळं संशयास्पद आहे. वाधवानच्या एडीआयएलचा घेऊन इतके गंभीर आरोप केले आहेत. तर त्यांच्यासोबत असे व्यवहार कसे काय करु शकते? असा सवाल करतानाच बाप-बेटे जेलमध्ये जाणार आहेत. किती कागद फडफडवा, असा दावाही राऊत यांनी केला.