Special Report | शिवसेनेचे ‘संजय’ आरोपांच्या चक्रव्युहात-tv9
भाजप विरुद्ध राऊत हा सामना मविआच्या स्थापनेआधीच सुरु झाला होता., कारण होतं मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना. मविआच्या स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे जवळपास दर पाचव्या वाक्यानंतर एकदा राऊत म्हणायचे.
राऊतांना कुणी सामनावीर म्हणतं. कुणी ठाकरेंकडची हुकमी तोफ..काही जण ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक म्हणून त्यांचा उल्लेख करतं. तर काही राऊतांना शिवसेनेतले शरद पवारांचे
हस्तकही म्हणतं. कुणी म्हणतं की राऊतांनीच 2019 मध्ये भाजपच्या तोंडी आलेला सत्तेचा घास हिसकावून घेतला. तर काहींच्या मते राऊतांनीच शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून तिचे दोन तुकडे केले. राऊत बोलायला लागले की एक गट त्यांना डोक्यावर घेतो., आणि दुसरा गटाच्या मात्र ते डोक्यात जातात. वास्तविक गेल्या अडीच वर्षात ३ पक्षांचं सरकार होतं., मात्र रोज आरोप-प्रत्यारोपांचा खरा सामना भाजप आणि राऊतांमध्येच व्हायचा. भाजपच्या जिल्हाध्यक्षांपासून ते हायकमांडपर्यंत प्रत्येक नेत्यावर राऊत तुटून पडले. 2019 आधी संजय राऊत या नावाचं वलय खासकरुन मुंबई आणि इतर काही भागांपर्यंत मर्यादीत होतं. मात्र शरद पवार आणि राऊतांच्याच पुढाकारानं मविआ स्थापन झाली… आणि त्यानंतर राऊतांचं नाव महाराष्ट्रभर गेलं. पण भाजप विरुद्ध राऊत हा सामना मविआच्या स्थापनेआधीच सुरु झाला होता., कारण होतं मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना. मविआच्या स्थापनेदरम्यान मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हे जवळपास दर पाचव्या वाक्यानंतर एकदा राऊत म्हणायचे.