Special Report | Nawab Malik यांच्या राजीनाम्यासाठी नरहरी झिरवळांची सही -Tv9
मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्च रोजी भाजपतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई येथे त्यानिमित्ताने मुंबई भाजपा कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत मार्गदर्शन केले.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जमीन व्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे अडचणीत आले आहेत. मलिक सध्या अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी कोठडीत आहेत. अशावेळी मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्यांसोबत जमीन व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चांगलेच आक्रमक झालेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात मलिकांच्या राजीनाम्याची मागणी भाजपनं लावून धरली. त्यानंतर आता या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 9 मार्च रोजी भाजपतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई येथे त्यानिमित्ताने मुंबई भाजपा कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत मार्गदर्शन केले. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा जी, आशीष शेलार, खा. गोपाळ शेट्टी जी, खा. मनोज कोटक आणि अन्य सहकारी यावेळी उपस्थित होते’, असं ट्वीट करत 9 मार्च रोजी मलिक यांच्या मागणीसाठी भाजप भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलीय.