मी त्यासाठी तयार आहे : अजित पवार… पहा यासह सुपरफास्ट 50 न्यूज
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी आपण आपल्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला तयार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आपण संविधान, कायदा आणि नियम पाळणारा कार्यकर्ता असल्याचे म्हणत चौकशी झाल्यास त्यास सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. याप्रकरणी पुन्हा चौकशी सुरू केली जाणार आहे. तर या प्रकरणी आपण आपल्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरे द्यायला तयार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच आपण संविधान, कायदा आणि नियम पाळणारा कार्यकर्ता असल्याचे म्हणत चौकशी झाल्यास त्यास सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर गिरीष महाजन यांचे नाव न घेता अजित पवार यांनी टीका केली आहे. तसेच काही नेते अर्वाच्च बोलतात असेही त्यांनी म्हटलं आहे. हिमाचल प्रदेश निवडणूक समितीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर अंधेरी पोटनिवडणूकीत घेतलेल्या माघारीवर देखिल चर्चा होण्याची शक्यता आहे. तर बुलढाण्यात शिंदे गटासह विविध पक्षांना धक्का बसला आहे. येथील अनेक कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत.