SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 2 September 2021
खासदार संभाजी छत्रपती हे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीकरिता संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजेंच्या या आवाहनास प्रतिसाद देऊन महाराष्ट्रातून शिवसेना खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व काँग्रेसतर्फे राज्यातील एकमेव खासदार बाळू धानोरकर हे आजारी असल्याने आमदार संग्राम थोपटे हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत.
खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. यावेळी ते राष्ट्रपतींसमोर मराठा आरक्षणाची कैफियत मांडून त्यातून मार्ग काढण्याचे साकडे राज्यपालांना घालणार आहेत. या शिष्टमंडळात राज्यातील सर्वच पक्षाचे खासदार सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.