देशातून मोदी यांची हवा संपत चाललीय, ठाकरे गटातील ‘या’ नेत्याची टीका
देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा संपत चालली आहे. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांना २०२४ च्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसणार असल्याचेही केली जोरदार टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ जानेवारी रोजी मुंबईच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना येत्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले. दिल्लीपासून महाराष्ट्र आणि मुंबईतही भाजपला पाठिंबा द्या. त्यामुळे विकासकामांना गती मिळायला मदत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना आवाहन केले. दरम्यान, ठाकरे गटातील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हवा संपत चालली आहे. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांना २०२४ च्या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसणार असल्याचेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. तर नरेंद्र मोदी यांचे २०२४ च्या निवडणुकांमध्ये मुंबई पालिका जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यांच्या कोणत्याही प्रयत्नांना कोणतेही यश येणार नाही, असे म्हणत चंद्रकांत खैरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.