कर्नाटक विधानसभा निकालाचे कल जाहीर होताच संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: May 13, 2023 | 10:59 AM

VIDEO | कर्नाटक विधानसभा निकालाचे परिणाम समोर येताच संजय राऊत यांचा मोदी-शाह यांच्यावर हल्लाबोल

मुंबई : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येण्यास सुरूवात झाली आहे. कर्नाटक निकालाचे कल जाहीर होताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संजय राऊत यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यवर जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटकच्या जनतेने मोदी-शाहांना झिडकारलं आहे, हे मान्य करा. अनेक ठिकाणी महाराष्ट्रातील भाजपा नेते गेले. ते जिथे जिथे गेले तिथे तिथे भाजपाचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रातून भाजपा नेत्यांची मोठी टोळी काँग्रेस, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कर्नाटकात गेली. त्या प्रत्येक ठिकाणी भाजपाचा दारूण पराभव झाला. कर्नाटकातील निकाल २०२४ साठी विरोधी पक्षांसाठी सत्तेचा दरवाजा उघडणारा असेल. २०२४ मध्ये असाच निकाल लागेल. ही एक लोकभावना आहे. देशाची मन की बात कर्नाटकातून बाहेर पडली, असल्याचे संजय राऊत म्हणाले. तर कर्नाटकात काँग्रेस सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय हा कर्नाटकातील भाजपचा पराभव नसून मोदी आणि शाह यांचा हा पराभव आहे. या दोन्ही नेत्यांनी हा पराभव स्वीकारला पाहिजे. या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता. प्रत्येक निवडणुकीत ते तंबू ठोकतात. पण तरीही कर्नाटकातील जनतेने मोदी आणि शाह यांना झिडकारलं आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

Published on: May 13, 2023 10:59 AM
Karnataka Election Result : ‘महाराष्ट्र एकीकरण समिती’चं यंदाही पाणीपत? बेळगावसह सीमाभागात काँग्रेस, राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?