Special Report | ‘शिवबंधन सोडून संजय राऊत हाती घड्याळ बांधणार’, कुणी केला मोठा दावा
VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, कुणी केला दावा? पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असा दावा भाजप आमदार नितेश राणा यांनी केला. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नितेश राणे यांच्या या दाव्यानुसार, येत्या १० जूनपूर्वीच संजय राऊत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. या दाव्यानंतर नितेश राणे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात वार पलटवार पाहायला मिळत आहे. सध्या सर्वपक्षीय नेत्यांचा फोकस अजित पवार यांच्यावर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणताय, अजित पवार यांच्या वावड्या उठवून मविआचे नेते त्यांची बदनामी करताय. तर दुसरीकडे शिंदेंचेच नेते म्हणताय अजित पवार लवकरच युती सोबत येतील. दरम्यान, शरद पवार यांच्या राजीमान्याआधी काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील राष्ट्रवादी आणि भाजपच्या सरकारची शक्यता वर्तविली होते. आता नितेश राणे यांनी केलेल्या दाव्यावर स्वतः संजय राऊत काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.