मनमाड इंधन प्रकल्पाबाहेर आंदोलन, नव्या वाहन कायद्याला विरोध कायम अन् चालकांचा संप सुरू
मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन सुरु झालं आहे. या आंदोलनामुळे इंधन वाहतूक करणाऱ्या दीड हजार वाहनांची चाकं थांबली आहे. मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर वाहन चालकांनी ठिय्या मांडून आंदोलन पुकारले
नाशिक, 2 जानेवारी 2024 : केंद्र शासनाच्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक, टँकर चालकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. यासंपात महाराष्ट्रातील चालकांचाही समावेश आहे. अशातच मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन सुरु झालं आहे. या आंदोलनामुळे इंधन वाहतूक करणाऱ्या दीड हजार वाहनांची चाकं थांबली आहे. मनमाडमधील इंधन प्रकल्पाबाहेर वाहन चालकांनी ठिय्या मांडून आंदोलन पुकारले आहे. केंद्र शासनाने आणलेला नवीन वाहन कायदा मागे घ्यावा, अशी एकच मागणी या सर्व चालकांची आहे. मनमाड येथील एचपीसीएल, बीपीसीएल, इंडीयन ऑईल आणि गॅस प्लँटमधून राज्यातील अनेक भागांत इंधन पुरवठा होतो. संपामुळे हजारो टँकर डेपो बाहेर थांबले आहेत. यासंदर्भात सोमवारी झालेली बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकारी आणि ट्रँकर चालक, मालक यांच्या यांच्यात बैठक होत आहे.