उद्धव ठाकरे यांच्या जीवाला धोका? मातोश्रीबाहेर घातपात होणार? महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला काय आला फोन?
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. तर मातोश्रीबाहेर घातपात होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला फोन
मुंबई, १५ जानेवारी २०२४ : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. तर मातोश्रीबाहेर घातपात होणार असल्याची शक्यताही वर्तविली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती मिळत आहे. धमकी देणारे ४ ते ५ जण उर्दूत बोलत असल्याची माहिती कंट्रोल रूमला फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली तर त्यांचं पूर्ण बोलणं ऐकल्याचा दावाही नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. तर मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करणारे ४ ते ५ जण उर्दू भाषेत बोलत होते. तसेच मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्यानं घेण्यासंदर्भातही ते बोलत होते. असा दावाही फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी आणि तपास सुरू केला आहे.