‘राज ठाकरे गर्दी जमवण्यात एक्सपर्ट’, कुणी लगावला खोचक टोला
VIDEO | राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा, या नेत्यानं दिला सल्ला
सांगली : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. त्यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याने देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय प्रश्नांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या सभेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये. भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे. भोंग्याना विरोध करू नये. राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा, असा सल्लाही त्यांनी दिला. बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. शिवसेना घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जबाबदार, असंही ते म्हणाले.