‘आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर?’ लोकसभा लढवणाऱ्या महिला उमेदवाराचं भन्नाट आश्वासन
लोकसभेसाठी उभ्या असलेल्या वनिता राऊत यांनी मतदारांना अनोखं अश्वासन... फक्त श्रीमंतांनीच व्हिस्की आणि बिअर का प्यावी? गरिबांना चांगली दारू का मिळू नये, असे म्हणत आनंदाच्या शिध्यात व्हिस्की, बिअर देण्याचं आश्वासन वनिता राऊत यांनी दिलं आहे. वनिता राऊत अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार आहेत.
चंद्रपुरातून लोकसभेसाठी उभ्या असलेल्या वनिता राऊत यांनी मतदारांना अनोखं अश्वासन दिलंय. फक्त श्रीमंतांनीच व्हिस्की आणि बिअर का प्यावी? गरिबांना चांगली दारू का मिळू नये, असे म्हणत आनंदाच्या शिध्यात व्हिस्की, बिअर देण्याचं आश्वासन वनिता राऊत यांनी दिलं आहे. वनिता राऊत अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार आहेत. वनिता राऊत २०२१ मध्ये चिमूरमध्ये निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील वनिता खरात यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंद हटवणं आणि गाव तिथं दारू यामुळे वनिता खरात या अनोख्या अश्वासनामुळे चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा वनिता खरात यांच्या भन्नाट आश्वासनांची चंद्रपुरातील मतदारांमध्ये चर्चा होत आहे. दरम्यान, संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी व आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी (एसएसटी) जिल्ह्यात प्रवेश करणा-या वाहनांची कडक तपासणी करावी,असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहे.