मी कार्यकर्त्यांना पोरकं होऊ देणार नाही…
त्नी ज्योती लाटकर-मेटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र विनायक मेटेंच्या माघारी मी महाराष्ट्राला पोरकं होऊ देणार नाही, माझ्या परीनं मी विनायक मेटे यांचे काम करत राहणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे.
शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे 14 ऑगस्ट रोजी पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यानंतर त्यांच्या कुंटुंबीयांसह कार्यकर्त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला. विनायक मेटेंच अपघात झाल्यानंतर तात्काळ त्यांना मदत मिळू शकली नाही, त्यानंतर मात्र त्यांना पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, त्यानंतर त्यांचे पार्थिव आज बीडमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांच्या पत्नी ज्योती लाटकर-मेटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमच्या कुटुंबीयांसह महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र विनायक मेटेंच्या माघारी मी महाराष्ट्राला पोरकं होऊ देणार नाही, माझ्या परीनं मी विनायक मेटे यांचे काम करत राहणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे.
Published on: Aug 15, 2022 02:27 PM
Latest Videos