“संभाजी भिडे अफजल खानाच्या वकिलाचा वंशज”, यशोमती ठाकूर यांचा हल्लाबोल
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.
अमरावती, 30 जुलै, 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. त्या म्हणाले की, “संभाजी भिडे यांना देशाबद्दल काही वाटतं की नाही? काहीही बेताल वक्तव्य करायचं आणि युवकांची माथी भडकवायची हे संभाजी भिडे यांचं षडयंत्र आहे. संभाजी भिडे जिथे राहतात तिथले लोकं म्हणतात की, संभाजी भिडे हे अफजल खान यांचे वकील श्रीकृष्ण कुलकर्णी यांचे वंशज आहेत. संभाजी भिडे यांना अटक केली पाहिजे. 15 ऑगस्टला तेढ निर्माण झाला तर त्याला जबाबदार सरकार असेल.”
Published on: Jul 30, 2023 12:46 PM