भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळवणारे अजित गोपछडे नेमके आहेत तरी कोण?
भाजपात दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते अजित गोपछडे यांनी उमेदवारी जाहीर केले आहे. ही उमेदवारी मिळाल्यानंतर अजित गोपछडे यांनी असे म्हटले की मला संधी दिली त्याचं मी सोनं करेन...
मुंबई, १४ फेब्रुवारी २०२४ : राज्यसभेकरता भाजपने तीन उमेदवार निश्चित केले असून यामध्ये नुकतेच भाजपात दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांच्यासह भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते अजित गोपछडे यांनी उमेदवारी जाहीर केले आहे. ही उमेदवारी मिळाल्यानंतर अजित गोपछडे यांनी असे म्हटले की मला संधी दिली त्याचं मी सोनं करेन… भाजपकडून राज्यसभेचं तिकीट मिळाल्यानतंर अजित गोपछडे यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित गोपछडे नेमके कोण आहेत? चला जाणून घेऊ….अजित गोपछडे यांच्यावर महाराष्ट्र भाजपच्या डॉक्टर सेलच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूशीतून आलेले कार्यकर्ते आहेत. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्या संपर्कातून ABVP मध्येही त्यांनी काम केले आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड नायगाव विधानसभेसाठी नेहमीत चर्चेत असणारे गोपछडे हे उमेदवार आहेत.