टी20 वर्ल्डकपचे 8 सामने होताच 250 कोटींचं होणार नुकसान
4 जून 2024
Created By : राकेश ठाकुर
टी20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे आणि न्यूयॉर्कमध्ये साखळी फेरीचे सामने सुरु आहेत.
न्यूयॉर्कच्या नसाऊ काउंटीमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियम तयार केले आहेत. यात स्टेडियमवर 8 सामने होणार आहेत.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर नसाऊ स्टेडियम तोडलं जाणार आहे. ही जमीनही नसाऊ काउंटीच्या हाती सोपवली जाईल.
नसाऊ स्टेडियम फक्त टी20 वर्ल्डकपसाठी बनवलं आहे. हे स्टेडियम बनवण्यासाठी 250 खर्च आला आहे.
नसाऊ स्टेडियम कंटेनर आणि लोखंड वापरून तयार केलं आहे. याला छप्पर नाही.
नसाऊ स्टेडियममध्ये भारत पाकिस्तान सामना 9 जूनला होणार आहे.
भारत या मैदानात तीन सामने खेळणार आहे. आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेशी दोन हात करेल.