काँग्रेस नेते राहुल गांधी ‘भारत जोड़ो न्याय यात्रा’वर आहेत.
22 february 2024
राहुल गांधी यांनी यात्रे दरम्यान राम मंदिर प्राणप्रतिष्ठानबाबत ऐश्वर्या रायसंदर्भात वक्तव्य केले.
राहुल गांधी म्हणाले होते की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात एकही ओबीसी चेहरा नव्हता. त्या ठिकाणी अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय आणि नरेंद्र मोदी होते.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल झाले.
आता अमिताभ बच्चन सून ऐश्वर्यासाठी पुढे आले आहे. त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.
अमिताभ बच्चन यांनी पोस्टमध्ये राहुल गांधीचे नाव घेतले नाही. परंतु सोशल मीडियावर ही पोस्ट राहुल गांधींसाठी चपराक असल्याचे म्हटले जात आहे.
अमिताभ यांनी लिहिले आहे की, ‘टी 4929 – वर्कआउटची वेळ.. शरीराची गतिशीलता.. मनाची लवचिकता.. बाकीचे वाट पाहू शकतात..’
अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. राहुल गांधी यांना हे उत्तर म्हटले जात आहे.
हे ही वाचा ऐश्वर्याने सांगितले, सलमानच्या नात्यावर का बोलत नाही