बॉलीवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या येणाऱ्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

29 March 2025

Created By : Jitendra Zavar

सलमान खानचा चित्रपट सिकंदर येत्या 30 मार्चला मोठ्या पडद्यावर रिलीज होत आहे.

सलमान खानने चित्रपटासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यानंतर चित्रपटासोबत त्याने घातलेल्या घड्याळीची चर्चा होऊ लागली आहे. 

सलमान खान याने घातलेली घड्याळ Jacob & Co. कंपनीची ‘Epic X Ram Janmabhoomi Titanium Edition 2’ आहे.

सलमान खान याने घातलेल्या घड्याळीची किंमत 34 लाख रुपये आहे. परंतु इतकी महाग घड्याळ सलमान खान याने विकत घेतली नाही. 

सलमान खानला Jacob & Co. कंपनीची ही घड्याळ मोफत मिळाली आहे. त्यासाठी त्याला एक रुपयाही खर्च करावा लागला नाही. 

माध्यमांमधील रिपोर्टनुसार ही घड्याळ त्याला त्याच्या आईने भेट दिली आहे.