भारतात आता नव्या आयकर प्रणालीत आयकर मर्यादा वाढवून 12 लाख करण्यात आली आहे. 

6 April 2025

Created By : Jitendra Zavar

12 लाखपेक्षा जास्त उत्पन्नावर आयकर लागतो. परंतु देशातील एका राज्यात कितीही कमाई केली तरी आयकर लागत नाही. 

भारतातील सिक्कीम या राज्यात नागरिकांना आयकर द्यावा लागत नाही. त्यामागे विशेष कारण आहे. 

सिक्कीम राज्याचे 1975 मध्ये भारतात विलीकरण झाले. त्यासाठी एक अट ठेवली होती. सिक्कीममधील जुना कायदा आणि विशेष दर्जा कायम राहील. 

सिक्कीमने आयकर मॅन्युअल 1948 तयार केला आहे. तो 1975 मधील कर कायद्यावर नियंत्रण करतो. 

त्यानुसार सिक्कीममधील कोणत्याही नागरिकाला भारतात आयकर लागत नाही.

सन 2008 मध्ये सिक्कीमचा जुना कायदा रद्द करण्यात आला. त्यावर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात कलम 10 (26AAA) वाढवण्यात आले. त्यानुसार राज्यातील लोकांना करात सुट दिली. 

सिक्कीममधील नागरिकांना शेअर, डिव्हिडंटच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पनावरही कर लागत नाही. 

सिक्कीमच्या विलीकरणापूर्वी जे लोक त्या राज्यात राहत होते, त्याना आयकर लागत नाही.