HRच्या पाठीपुढे आणि चेक शिवाय मिळणार पीएफचे पैसे, कसं ते जाणून घ्या
7 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी नवनवीन अपडेट्स आणत असते.
संस्थेने अलिकडेट क्लेम सेटलमेंटशी संबंधित नियमात बदल केला आहे. आता पीएफच्या पैशांसाठी फेऱ्या मारण्याची गरज नाही.
पीएफ खात्यात बँक खाते यूएएनशी लिंक करण्यासाठी कंपनीकडून मंजुरी घेण्याची गरज नाही.
पीएफ काढण्यासाठी तुम्हाला चेकचा फोटोही द्यावा लागणार नाही.
कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हंटलं की, कर्मचाऱ्यांना पीएफमधून पैसे काढण्यासाठी बँक पासबुक किंवा चेकबुकचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही.
बँक खाते युएएनशी लिंक करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या एचआरकडून मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही.
ईपीएफओने घेतलेल्या या निर्णयाचा थेट फायदा 8 कोटींहून अधिक पीएफ कर्मचाऱ्यांना होईल.