ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेजनचे फाउंडर अन् जगातील दुसरे श्रीमंत उद्योजक जेफ बेजोस लग्न करणार आहेत.
23 December 2024
60 वर्षांचे जेफ बेजोस 55 वर्षीय गर्लफ्रेंड लॉरेन सांचेज सोबत लग्न करणार आहेत.
कोलोराडोमधील एस्पेन येथे 28 डिसेंबर रोजी हा लग्न सोहळा होणार आहे.
डेली मेल अन् न्यूयॉर्क पोस्टनुसार, विंटर थीमवर हे लग्न होणार आहे. या लग्नात 600 मिलियन डॉलर (जवळपास 5000 कोटी रुपये) खर्च होणार आहे.
55 वर्षीय लॉरेन सांचेज 9 डिसेंबर 1969 रोजी यांचा अल्बुकर्क, न्यू मॅक्सिको येथे जन्म झाला.
लॉरेन पत्रकार अन् पायलट आहे. फॉक्स स्पोर्ट्समध्ये अँकर म्हणून त्यांनी काम केले आहे.
2005 मध्ये लॉरेन यांनी हॉलीवूडमधील एजेंट पॅट्रिक व्हाइटसेल सोबत लग्न केले होते. 2019 मध्ये त्यांना घटस्फोट दिला.
लॉरेन प्रमाणे जेफ बेजोस यांचेही हे दुसरे लग्न आहे. 2019 मध्ये त्यांनी पहिली पत्नी मैकेंजी स्कॉटला घटस्फोट दिला. दोघांचे लग्न 1994 मध्ये झाले होते.
हे ही वाचा... आराध्याची अॅक्टींग पाहून अमिताभ यांनी वाजवल्या टाळ्या, अभिषेक-ऐश्वर्याने बनवला व्हिडिओ