उद्योगपती जेआरडी टाटा यांना भारतीय हवाई उद्योग क्षेत्राचे पितामह म्हटले जाते.

5 जानेवारी 2025

उद्योगपती जे.आर.डी टाटा भारतातील पहिले पायलट होते. त्यांनी १५ ऑक्टोंबर १९३२ रोजी पहिले विमान उडवले होते. 

टाटा एअरलाईन्सची स्थापना जेआरडी टाटा यांनी केली होती. त्यांनीच कराची ते मुंबई पहिले विमान उड्डान केले. 

जेआरडी टाटा यांना भारतातील पहिले पायलट म्हटले जाते. त्यांना १० फेब्रुवारी १९२९ रोजी पायलट लायसन्स मिळाले होते. 

१९४६ मध्ये टाटा एअरलाईन्सचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले. 

१९४८ मध्ये एअर इंडियाचे पहिले आंतरराष्ट्रीय विमान उड्डान मुंबई ते लंडन असे झाले.

जेआरडी टाटा यांनी १९७८ पर्यंत एअर इंडियाची जबाबदारी सांभाळली. 

जेआरडी टाटा यांना विमानसंदर्भात इतकी आवड होती की त्यांनी त्यासंदर्भात असलेली सर्व पुस्तके वाचून काढली होती.