रतन टाटा यांचे शिक्षण किती  झाले होते ? जन्म कुठचा ?

10 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

टाटा सन्सचे मानद चेअरमन रतन नवल टाटा काळाच्या पडद्याआड गेलेत.86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले

बुधवारी रात्री अकरा वाजता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. शासकीय इतमामात त्यांच्या अंतिम संस्कार होत आहेत

 रतन टाटा सर्वात लोकप्रिय उद्योजक होते, तरुणपणी हॉलीवूडच्या हिरो सारखी त्यांची पर्सनालिटी होती.

 टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 मध्ये सुरत येथे झाला.आजी नवाझबाई टाटा हिने त्यांना वाढविले

ते दहा वर्षांचे असतान त्यांच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाल्याने आजीकडे ते वाढले

मुंबईतून त्यांचे शिक्षण झाले.परदेशातून कॉर्नेल युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून उच्च शिक्षण झाले

 5 फूट 10 इंच उंचीचे टाटा अब्जावधी साम्राज्याचे मालक असले तरी त्यांनी आयुष्यभर साधेपणाने जीवन व्यतित केले

 1961 मध्ये टाटा ग्रुपमधून करिअर सुरु केले, 1991 मध्ये चेअरमन झाले.2012 मध्ये ते निवृत्त झाले.

ते आयुष्यभर अविवाहीत राहीले.चार वेळा त्यांना प्रेम झाले.एकदा तर लग्नापर्यंत प्रकरण पोहचले. परंतू नशिबात काही वेगळे होते

 रतन टाटा यांचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवाल यांच्याबरोबर जोडले गेले होते