रिलायन्स उद्योग समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी अन् नीता अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी पदयात्रेत आहे.
5 April 2025
Created By : Jitendra Zavar
140 किलोमीटर पदयात्रेत जाण्यासाठी अनंत अंबानी दररोज साधारणपणे 15 किलोमीटर चालतात. ते रात्रीच्या वेळी प्रवास करतात.
जामनगर ते द्वारका अशी 140 किमी पदयात्रा सुरू केली आहे. द्वारकेत ते 10 एप्रिलपूर्वी पोहचतील. 10 रोजी त्यांचा 30 वा वाढदिवस आहे.
अध्यात्मिक व्यक्ती असलेले अनंत अंबानी द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात जाऊन भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेणार आहे.
द्वारकाधीश मंदिर अशा ठिकाणी आहे, जेथे हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण यांचे वास्तव्य होते. मंदिराची निर्मिती भगवान श्रीकृष्ण यांच्या पंतूने केल्याचे म्हटले जाते.
द्वारकाधीश मंदिर 2500 वर्ष जुने असल्याचे म्हटले जाते. हे मंदिर पाच मजली आहे. एकूण 72 खांबांवर हे मंदिर उभारले आहे.
मंदिराचा ध्वजाचे पुजेसाठी खूप महत्व आहे. वारा कोणत्याही दिशेने असला तरी ध्वज पश्चिम ते पूर्व असाच फडकत राहतो.
मंदिरावर फडकवणारा हा झेंडा दिवसातून पाच वेळा बदलण्यात येतो. त्याची वेळसुद्धा निश्चित असते.