देशात बुलेट ट्रेन सुरु करण्याचे काम वेगाने सुरु आहे. तसेच या प्रकल्पावर काम करण्यासाठी कर्मचारी भरतीही सुरु करण्यात आली आहे.

4 April 2025

Created By : Jitendra Zavar

बुलेट ट्रेन प्रकल्पावर काम करण्यासाठी युवकांना चांगली संधी आली आहे. 

नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHSRCL) मॅनेजर पदासाठी भरतीचे अर्ज मागवण्यात आले आहे. 

बुलेट ट्रेन प्रकल्पावर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. उमेदवार 24 एप्रिल 2025 पर्यंत  ऑनलाइन अर्ज करु शकता.

या पदासाठी अर्ज ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (सिव्हील) – 35 पदे ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (इलेक्ट्रिकल) – 17 पदे ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (S&T) – 03 पदे ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (रोलिंग स्टॉक) – 04 पदे ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (आर्किटेक्चर) – 08 पदे ज्युनियर टेक्निकल मॅनेजर (डेटाबेस एडमिन) – 01 पदे असिस्टेंट मॅनेजर (खरेदी) – 01 पदे असिस्टेंट मॅनेजर (सामान्य) – 01 पदे

उमेदवारास आपला अर्ज NHSRCL ची अधिकृत वेबसाइट nhsrcl.in वर जाऊन करता येणार आहे. होमपेजवरील करियर सेक्शनमध्ये जाऊन Current Openings वर क्लिक करा.

रजिस्ट्रेशन लिंकवर जाऊन मागितलेली माहिती भरा. त्यानंतर कागदपत्रे अपलोड करुन पेमेंट भरा. त्यानंतर स्लीप डाऊनलोड करुन ठेवा.