22 नोव्हेबर 2024

पर्थमध्ये 69 वर्षानंतर टीम इंडियाने केली अशी कमाल

Created By: राकेश ठाकुर

पर्थमध्ये पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा डाव 150 धावांवर आटोपला. 

टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज पहिल्याच दिवशी फेल गेले. पण डेब्यू करणाऱ्या नितीश कुमार रेड्ड़ीने सर्वाधिक 41 धावा केल्या. 

भारतीय फलंदाज या पहिल्या डावात फेल गेले.पण या दरम्यान टीम इंडियाने एक खास रेकॉर्डची पुनरावृत्ती केली आहे. 

केएल राहुल, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल तीन विकेट विकेटकीपर बॅट्समन संघात खेळत आहेत. 

जवळपास 69 वर्षांना कसोटी संघात टीम इंडियाकडून 3 विकेटकीपर प्लेइंग 11 चा भाग आहेत. 

यापूर्वी 1955 मध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाकडून विजय मांजरेकर, नरेन ताम्हाणे आणि माधव मंत्री प्लेइंग 11 मध्ये होते. 

या सामन्यात केएल राहुलने 26, ऋषभ पतंने 37 आणि ध्रुव जुरेलने 11 धावा केल्या.