21 डिसेंबर 2024

पृथ्वी शॉकडून आरपारची लढाई! एमसीएच्या वक्तव्यानंतर पुन्हा झाला व्यक्त, म्हणाला..

पृथ्वी शॉ गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनशी लढण्याच्या तयारीत आहे. 

पृथ्वी शॉला टीम इंडियात जागा मिळत नाही. तसेच आयपीएलमध्येही कोणीच विकत घेतलं नाही. 

पृथ्वी शॉला आधी मुंबईच्या रणजी संघातून वगळलं. त्यानंतर आता विजय हजारे ट्रॉफीतही संधी नाकारली आहे. 

पृथ्वी शॉने त्यानंतर लगेचच इंस्टाग्रामवर पोस्ट आकडे दाखवले होते. त्यावर एमसीएने उत्तर दिलं होतं. 

एमसीएच्या एका अधिकाऱ्याने पृथ्वी शॉची वागणूक आणि परिस्थितीला जबाबदार धरलं. तसेच शॉ स्वत:चा शत्रू असल्याचं सांगितलं आहे. 

पृथ्वी शॉ सुधारण्याऐवजी लढण्याच्या तयारीत आहे. त्याने पुन्हा एकदा इंस्टाग्राम पोस्ट करत अप्रत्यक्षरित्या एमसीएवर निशाणा साधला आहे. 

शॉने लिहिलं की, 'जर तुम्हाला ते पूर्णपणे समजत नसेल, तर त्यावर बोलू नका. अनेक लोकं अर्ध तथ्यांव पूर्ण मत मांडतात.'