बुमराहकडे सिडनीत इतिहास रचण्याची संधी, रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सज्ज
2 जानेवारी 2025
जसप्रीत बुमराहने या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत
इंडिया-ऑस्ट्रेलियात पाचवा आणि अंतिम कसोटी सामना हा सिडनीत, बुमराहला 2 विक्रम मोडीत काढण्याची संधी
बुमराहच्या नावावर या मालिकेत अद्याप 30 विकेट्सची नोंद, यॉर्कर किंगने आणखी 2 विकेट्स घेतल्यास तो ऑस्ट्रेलियात एका मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरेल
बिशन सिंह बेदी यांच्या नावावर सध्या हा विक्रम आहे, बिशन सिंह बेदींनी 1977-78 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 31 विकेट्स घेतल्या होत्या
तसेच बुमराह एका बॉर्डर गावसकर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याच्या उंबरठ्यावर आहे
हरभजन सिंह याने 2000-01 च्या बीजीटीमध्ये 32 विकेट्स घेतल्या होत्या, बुमराहला भज्जीचा विक्रम मोडीत काढण्यासाठी 3 विकेट्सची गरज
बुमराहने या मालिकेतील प्रत्येकी सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराह सिडनीत इतिहास घडवेल, अशी आशा आहे.